रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मार्च 2020 (13:23 IST)

कुत्र्याच वर्षश्राद्ध, भगत कुटुंबाचे अनेक संकटात केले होते रक्षण

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात चक्क एका पाळीव कुत्र्याचे वर्षश्राद्ध घालण्यात आले आहे. शिरूर तालुक्यातील सादलगाव येथील दिगंबर दत्तोबा भगत हे आपल्या कुटुंबासह गेल्या वीस वर्षांपासून मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मोलमजुरी करत असताना भगत कुटुंबाने एका भटक्या कुत्र्याला 
 
आसरा दिला होता.  त्याचं पालन पोषण, संगोपनाची संपूर्ण जबाबदारी या कुटुंबाने उत्तमरित्या पार पाडली. त्यांनी या भटक्या कुत्र्याचे नाव ‘मोती’ असे ठेवले होतं.  त्याने भगत कुटुंबाचे अनेक संकटातून रक्षण केले.
 
वर्षभरापूर्वी त्याचा अचानक मृत्यू झाला. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ज्याप्रमाणे अंत्यविधी करण्यात येतात. तसेच मोतीच्या निधनानंतर हिंदू संस्कृतीप्रमाणे अंत्यविधी करण्यात आले. तर आता भगत कुटुंबाने एक वर्षानंतर न विसरता मोतीच्या वर्षश्राध्द आणि श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित केला.