मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं निधन

व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं शुक्रवारी मुंबईतल्या दादरमध्ये निधन झालं. ते 69 वर्षांचे होते.  
 
सबनीस यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
 
सबनीस यांचा जन्म 12 जुलै 1950ला झाला. त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं होतं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी नाकारून त्यांनी स्वतंत्र व्यंगचित्रकार म्हणून काम सुरू केलं.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्मण हे त्यांचे आदर्श होते. बाळासाहेब ठाकरे राजकारणात सक्रीय झाल्यानंतर त्यांनी 'मार्मिक'ची जबाबदारी सबनीस यांच्याकडे सोपवली. त्यांनी तिथं 12 वर्षं काम केलं. त्यानंतर त्यांनी 'लोकसत्ता'सह अनेक दैनिकांमध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केलं.