बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (17:06 IST)

Jamkhed : बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

Jamkhed  : जामखेडच्या खर्डा येथे तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मयत मुले एकाच कुटुंबातील होती. या घटनेनं शोककळा पसरली आहे. कपडे धुण्यासाठी आईसह गेलेल्या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. सदर घटना खर्ड्या पासून 3 किमी च्या अंतरावर शिर्डी- हैद्राबाद महामार्गावरील आंतरवली फाटाच्या पाझर तलावात घडली आहे. या अपघातात सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (14),दीपक ज्ञानेश्वर सुरवसे (16), कृष्णा परमेश्वर सुरवसे(16), असे मयतांची नावे आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, जामखडे तालुक्यातील खर्डा येथे राहणाऱ्या सुरवसे कुटुंबात एका वृद्ध व्यक्तीचे निधन काही दिवसांपूवी झाले.सुरवसे कुटुंबातील काही महिला सुतक फेडणासाठी 5 ऑक्टोबर रोजी पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेले असता कुटुंबातील सानिया ज्ञानेश्वर सुरवसे हिचा पाय घसरून ती पाण्यात पडली आणि बुडू लागली. तिला बुडताना पाहून तिचा सख्खा भाऊ दीपक आणि चुलत भाऊ कृष्णा हे दोघे पाण्यात तिला वाचवण्यासाठी गेले.मात्र त्यांना पाण्याच्या अंदाज आला नाही आणि तेही पाण्यात बुडू लागले. त्या तिघांना वाचवण्यासाठी त्यांची आई देखील पाण्यात उतरली आणि पाण्यात बुडू लागली.

आईला तिथे असलेल्या लोकांनी वाचवले मात्र तिघे मुले पाण्यात बुडून मृत्युमुखी झाली. इतर महिलांनी आरडाओरड केल्यामुळे गावाचे लोक घटनास्थळी आले आणि त्यांनी तिघांना पाण्यातून बाहेर काढले आणि तातडीनं रुग्णालयात नेले मात्र त्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिघांचे शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकांना दिले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  
 
Edited by - Priya Dixit