सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 जुलै 2023 (08:34 IST)

पावसाळी सहलीसाठी गेलेले अलिबाग-थेरोंडा येथील दोन सख्खे भाऊ बुडाले

drowned
पेण पाबळ येथे पावसाळी सहलीसाठी आलेल्या अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथील दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. या दोघांचेही मृतदेह हाती आले आहेत.
थेरोंडा येथील चार तरुण  17 जुलै पावसाळी सहलीसाठी पेण तालुक्यातील पाबळ येथे गेले होते. पाबळ येथील बरडावाडी परिसरात नदीमध्ये पोहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने इलान बेंजामीन वासकर ( वय 25) व इजरायल बेंजामीन वासकर ( वय 22) हे दोन सख्खे भाऊ वाहून गेले.
 
या बाबत स्थानिक नागरिकांना माहिती मिळताच, त्यांनी नदीपात्रात शोधा शोध केली असता दोन्ही भावांचे मृतदेह हाती लागले. या प्रकरणाची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास वडखळ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर हे करत आहेत.
 
Edited By - Ratnadeep ranshoor