मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जयंत पाटील यांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री जयंत पाटील यांनी निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष सुनील तटकरे यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस करण्यात आले आहे. नवाब मलिक यांना प्रदेश उपाध्यक्ष, हेमंत टकले यांची खजिनदारपदी तर शिवाजीराव गर्जे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. याच बैठकीत शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याचे घोषित करण्यात आले. 
 
यावेळी पदाधिकारी निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक येथील निसर्ग कार्यालयात झाली. प्रदेशाध्यक्षपदासाठी जयंत पाटील यांच्यासह माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावांची चर्चा होती, मात्र मावळते अध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांचे नाव सुचवले.शशिकांत  शिंदे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप वळसे-पाटील यांनी जयंत पाटील यांची निवड एकमताने झाल्याचे जाहीर केले.