मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2020 (14:20 IST)

महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? जयंत पाटील यांनी जनतेला केले सावध

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्‍या भाजपसोबत जावून आपण महाराष्ट्रद्रोह तर करत नाही ना? याचा विचार जनतेने करावा असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
 
हातात काळं घेताना एकदा तरी विचार करा, आपण अहोरात्र महाराष्ट्रासाठी झटणाऱ्या डॉक्टरांचा, पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य सेवकांचा अपमान तर करत नाही ना! असा विचारही जनतेने मनात आणावा अशा आशयाचे ट्वीट करून जयंत पाटील यांनी भाजपाच्या आंदोलनावर जनतेला सावध केले आहे.