जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक अभिजित पवार आणि हेमंत वाणी अजित पवारांच्या पक्षात शामिल
महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसला आहे. आव्हाड यांचे दोन समर्थक अभिजित पवार आणि हेमंत काणी यांनी शरद पवार पक्षाला राम राम करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
हा पक्ष प्रवेश त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत केला आहे. त्यांच्या सह काँग्रेसचे चंद्रकांत दैमा यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे सावलीसारखे सोबत राहणारे स्वीय सहाय्यक शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत पवार आणि प्रदेश सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह ठाणे शहर आणि मुंब्रा येथील शेकडो युवा कार्यकर्त्यांनी मंगळवारी महिला विकास मंडळ सभागृहात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यशैलीवर नाराज होऊन या दोन्ही नेत्यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे.
Edited By -Priya Dixit