बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

काजवा महोत्सवात वेळेची मर्यादा पाळा

अहमदनगर व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या भंडारदरा येथील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात काजवा महोत्सव सुरु आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या महोत्सवाची प्रवेशाची वेळ रात्री  9 पर्यंत असून अभयारण्यातून बाहेर पडण्याची वेळ रात्री 12 पुर्वीची आहे. तरी पर्यटकांनी वेळेची मर्यादा पाळावी, असे आवाहन वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अ.मो.अंजनकर यांनी केले आहे.  
 
वन्यप्राण्यांकडून हल्ला होण्याचा धोका असल्याने अभयारण्यात काजवा बघण्याचा आनंद लुटतांना मुख्य रस्ता सोडून पर्यटकांनी जंगलात दुरवर जाऊ नये. सुरक्षित अंतर ठेवून पर्यटकांनी काजव्याचे निरीक्षण करावे. अभयारण्यात क्षेत्रात प्रवेश करतांना वाहनाचे दिवे मंद स्वरुपात ठेवावे व अनावश्यकरीत्या हॉर्नचा वापर तसेच कुठल्याही प्रकारचे ज्वालाग्रही पदार्थ बाळगु नये. पर्यटकांनी धुम्रपान व मद्यपान कटाक्षाने टाळावे, असे वन्यजीव विभाग ,नाशिक यांनी कळविले आहे.