सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2019 (10:20 IST)

अहमदनगरमध्ये क्रिकेटच्या बॅटने घेतला आई मुलाचा जीव

घरगुती वादातून पत्नी व सात वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बॅटने मारून पतीने निघृत हत्या केली. त्यानंतर शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. मात्र पोलिसांनी त्या बापाला अटक केली आहे. 
 
राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात घटना घडली.भारत मोरे (वय 30, रा. मोरेवस्ती, वांबोरी, ता. राहुरी) हे अटक केलेल्या माथेफिरू पतीचे नाव असून, पत्नी संध्या भारत मोरे, साई भारत मोरे (वय 7) मयत आई व मुलाचे नावे आहेत. 
 
नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील बांबोरी येथील मोरेवस्तीवर राहणाऱ्या 30 वर्षीय भारत मोरे यांचे पत्नी संध्या सोबत जबर भांडण झाले. या दरम्यान, संतापलेल्या भारतने पत्नी संध्या आणि पाच वर्षाचा मुलगा साई यास क्रिकेटच्या लाकडी बॅटने जबर मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला. नंतर हा प्रकार पाहून आरोपीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला पकडले व त्याला अटक केली. घटनेनंतर माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे आदींसह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. भारत मोरे यांच्या घरातील इतर लोक लग्नाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले असताना हा प्रकार घडला आहे.