1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (22:58 IST)

आपल्यावर झालेल्या हल्ल्यामागे अनधिकृत बांधकाम लॉब : कल्पिता पिंपळे

आपल्यावर झालेल्या हल्ल्यामागे अनधिकृत बांधकाम लॉबीचा हात असण्याची शक्यता वर्तवत सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांनी खळबळ उडवून दिली आहे. फेरीवाल्याचा हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या कल्पिता पिंपळे यांना  हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
 
ठाणे महानगरपालिकेच्या माजिवडा मानपाडा  प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे  यांच्यावर कासारवडवली बाजारात अनधिकृत फेरीवाला हटाव मोहिमेदरम्यान एका माथेफिरु फेरीवाल्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. ह हल्ला एवढा जबरदस्त होता की यात कल्पिता पिंपळे यांची दोन बोटी तुटली. तर त्यांच्या अंगरक्षकाला देखील आपलं एक बोट गमवावं लागलं. 
 
या दोघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार होऊन कल्पिता पिंपळे यांना  डिस्चार्ज मिळाला. आपल्यावर झालेल्या हल्ल्यामागे अनधिकृत बांधकाम लॉबी असल्याचा सनसनाटी आरोप करून कल्पिता पिंपळे यांनी खळबळ उडवून दिली आहे. आपण या क्षेत्रात गेली अकरा वर्षे काम करत असून आत्तापर्यंत कुठल्याही फेरीवाल्याला एवढे पॅनिक होताना पाहिले नाही. त्यामुळे हा हल्ला सुनियोजित होता व आम्हाला जीवे मारण्याचे कारस्थान होते अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 
 
आपला मृत्यू झाला असता तर आपल्या कुटुंबाचं फार मोठं नुकसान झालं असतं असं त्यांनी सांगितलं. अशा हल्ल्याने आपण डगमगून जाणार नाही आणि पुन्हा नव्या जोमाने कारवाईस सुरुवात करू अशी ग्वाही त्यांनी दिली. आपल्यावर हल्ला केलेल्या सदर आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.