सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (21:38 IST)

दाभोलकर हत्या प्रकरण, सर्व पाच आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करा

अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुण्यातील एका विशेष न्यायालयाने सनातन संस्थेशी संबंधित सर्व पाच आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. १५ सप्टेंबरला या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप पत्र निश्चित केले जाणार आहे.
 
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
 
२०१४ मध्ये पुणे शहर पोलिसांकडून हे प्रकरण हाती घेणाऱ्या सीबीआयने आतापर्यंत पाच आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस आर नावंदर यांचे विशेष न्यायालय सध्या या प्रकरणाची कार्यवाही करत आहे. न्यायालयाने म्हटले की, ते पाचही आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश देत आहेत.
 
न्यायालयाने म्हटले आहे की, डॉ.वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे या चार आरोपींविरोधात हत्येचा, हत्येचा कट रचण्याच्या आणि यूएपीए व शस्त्रास्त्र कायद्याच्या तरतुदींनुसार दोषारोप असतील.