शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जानेवारी 2022 (08:55 IST)

करुणा शर्मांचा आरोप- माझे कार्यक्रम रद्द करण्यासाठी पोलिसांवर दबाव

ठाकरे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यामुळे चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांच्या औरंगाबादमध्ये मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली.

करुणा शर्मा यांनी यावरून नाव न घेता, माझे कार्यक्रम रद्द करण्यासाठी कुणीतरी पोलिसांवर दबाव आणत आहे, असा आरोप केला. 

"कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी परवानगी दिली होती, त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाची तयारी सुद्धा झाली होती. मात्र रात्री अचानक पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना पोलीस ठाण्यात बसून ठेवलं, तसंच परवानगी सुद्धा नाकारली. ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्याच्या मालकाला सुद्धा माझ्यामुळे त्रास देण्यात आला," असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.