शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जुलै 2022 (15:19 IST)

कास तलाव ओसुंडून वाहतोय..सातारकरांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध

सातारा- मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव आज मध्यरात्री ओव्हरप्लो झाला असुन सातारकरांना मुबलक पाणीसाठा ऊपलब्ध झाल्याने आता पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या चार दिवसांत सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे इतर धरणांत देखील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे.
 
कास परिसरात गेल्या पंधरा ते विस दिवसांपासुन पावसाची मुसळधार सुरु असल्याने कास तलावमध्ये मोठया प्रमाणात पाण्याची आवक होत होती. यावर्षी नव्याने धरणाच्या भिंतीची उंची वाढवुन साठवण क्षमता दुप्पटीपेक्षा आधीक वाढवल्याने तलाव भरण्यास काहीसा ऊशीर झाला. शुक्रवारी मध्यरात्री तलाव ओव्हरफ्लो होऊन नवीन साडंव्यावरून पाणी वाहु लागले. तलावमध्ये पाण्याची साठवण पातळी ४७ फुट उंचीने भरली असुन 0.03 टिएमसी ईतका पाणीसाठा झाला. त्यामुळे सातारकरांना मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.