शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जुलै 2023 (15:48 IST)

कसारा अपघात : कसारा रेल्वेस्थानकाजवळ तीन कामगारांना रेल्वेची धडक, एकाचा मृत्यू

indian railway
कसारा  रेल्वे स्थानकाजवळ पॉइंटवर काम करताना अचानक आलेल्या एक्स्प्रेसने तीन कामगारांना रेल्वेने धडक दिल्याची घटना  घडली असून या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. 

सदर घटना मध्य रेल्वे मार्गावरील कसारा स्थानका जवळ घडली असून कल्याण, इगतपुरी, नाशिकचे कामगार कसारा रेल्वे स्थानकात कामाला होते. पॉइंटवर काम करताना पाऊस कोसळत होता. मुसळधार पावसात कामगारांना आलेली एक्स्प्रेस दिसली नाही.आणि एक्स्प्रेसने कामगारांना उडवलं. त्या कामगारांपैकी एकाचा ट्रॅक खाली येऊन दुर्देवी मृत्यू झाला. रिजवान आलम असे या मयत कामगाराचे नाव आहे. तर नीलम मिश्रा आणि उमेश सिंग हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केले.

कसारा रेल्वेस्थानकाअंतर्गत येणाऱ्या एसएनटी विभागात काम करणारे कामगार संध्याकाळी कसारा पॉईंट डाऊन मार्गावर काम करत होते. मुसळधार पाऊस कोसळत होता. कल्याणहून कसारा रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारी एक्स्प्रेस आलेली कामगारांना दिसली नाही आणि एक्स्प्रेसने तिघांना उडवलं. त्यात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले.    
 
Edited by - Priya Dixit