गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:55 IST)

काशिफने मला क्रुझ पार्टीसाठी आमंत्रित केले होतं -पालकमंत्री अस्लम शेख

काशिफने मला क्रुझ पार्टीसाठी आमंत्रित केले होतं. पण मी पार्टीला गेलो नाही. मी काशिफ खानला ओळखत नाही. क्रुझवरील पार्टीची मला काहीच माहिती नव्हती. त्या पार्टीच्या माध्यमातून काही षडयंत्र रचण्याचा डाव होता की नाही हे मला माहीत नाही. त्याचा तपास एजन्सीने करावं, असा खुलासा पालकमंत्री अस्लम शेख यांनी पत्रकार परिषदेत केला.
 
दिवसभरात मला 50 लोक मला आमंत्रित करतात. एखाद्या लग्नात गेलो तर लोकं वाढदिवसाचंही निमंत्रण देत असतात. मी ज्या कार्यक्रमात जातो. त्याची माहिती घेत असतो. जिथे जातच नाही, त्याची माहिती घेत नाही. मला वाटतं ज्या कार्यक्रमाला जायचं नाही त्याची माहिती घेणंही योग्य नाही, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं.
तसेच त्या पार्टीत काय होणार होतं. मला माहीत नाही. हे तपास यंत्रणेने शोधावं. काशिफशी फोनवर संभाष झालं नाही. संभाषण झाल्याचं मला आठवत नाही. त्याने भेटून आमंत्रण दिलं होतं हे मात्र नक्की, असं त्यांनी सांगितलं.
 
गुजरातमध्ये 20 हजार कोटीचं ड्रग्ज पकडलं
 
शाहरुख खानच्या मुलाचं नाव आल्यानंतर मीडियाने त्याचं कव्हरेज सुरू केलं. त्याचवेळी गुजरातमध्ये 20 हजार कोटीचं ड्रग्ज पकडलं त्यावर चर्चा झाली नाही, याकडेही त्यांनी मीडियाचं लक्ष वेधलं. एका मुलाला नशामुक्ती केंद्रात पाठवायला हवं होतं की नाही हे तपासायला हवं होतं. मीडियानेही तपास करायला हवा होता, असंही ते म्हणाले.