ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन खडसे यांनी मागितली माफी
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन माफी मागीतली आहे. ब्राह्मण बांधवांच्या भावना दुखावण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असं खडसेंनी ट्विटरवरुन स्पष्ट केलं आहे. मी कायमच ब्राह्मणांचा आदर केला आहे, असंही खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
एकनाथ खडसे यांनी ट्विटवरुन ब्राह्मण समाजासंदर्भात केलेल्या वक्त्यावरुन माफी मागितली आहे. “दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असं खडसेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी मी सभेमध्ये जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.