शिवसेनेच्या बालेकिल्ला असणाऱ्या भांडुपमध्ये खिंडार
शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या भांडुपमध्ये खिंडार पडलं आहे. माजी आमदार अशोक पाटील यांनी काही पदाधिकाऱ्यांसोबत एकनाथ शिंदे गटाची वाट धरली आहे. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेनंतर अशोक पाटील हे नाराज असल्याची चर्चा भांडुप मध्ये सुरू होती.
भांडुपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर शिंदे गटाची वाट धरत असल्याचं अशोक पाटील यांनी सांगितलं. शिंदे गटात सामील होणाऱ्यांचे हातपाय तोडू असा इशारा जेव्हा शिवसैनिकांनी दिला त्यावेळी व्यथित होऊन आपण हा निर्णय घेतल्याचं अशोक पाटील यांनी म्हटलंय.
तसंच जर कुणी आमचे हात पाय तोडणार असतील तर त्यांनी तारीख आणि वेळ सांगावी असा इशाराही अशोक पाटील यांनी शिवसैनिकांना दिला आहे.