शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 21 ऑगस्ट 2022 (10:02 IST)

देवेंद्र फडणवीस कृष्ण नव्हे, धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत,' सुषमा अंधारेंची टीका

devendra fadnavis
राज्याच्या राजकारणात कृष्णाचं पात्र देवेंद्र फडणवीस रंगवत आहेत, असं त्यांना वाटत असेल तर त्यांचा अभ्यास कच्चा आहे. त्यांची पात्रांची निवड चुकली आहे. फडणवीस कृष्ण नव्हे तर धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
 
मुंबईतील भाजपा मेळाव्यात मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी महाभारताचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'कृष्ण' तर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख 'कर्ण' असा केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी भाजपवर टीका केली.
 
त्या म्हणाल्या, "मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे सध्या धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत. एक असा धृतराष्ट्र ज्याने आधी ढीगाने आरोप केले. पण आता सगळं कळत असूनही आता त्यांचे डोळे, ओठ बंद आहेत. EDने आरोप केलेले सर्व लोक आता त्यांच्याकडे आहेत. पण धृतराष्ट्र काहीच बोलत नाही. सगळ्यांना सामावून घेत आहे."