गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2022 (21:51 IST)

खोपकर यांचा बॉलिवूडमधील निर्मात्यांना इशारा

amay khopkar
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत बॉलिवूडमधील निर्मात्यांना इशारा दिला आहे. बॉलिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आला आहे. असं कानावर येतंय, ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागते. म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की, फक्त मुंबईच काय हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतील कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील, असे अमेय खोपकर यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor