शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (15:31 IST)

भुजबळांच्या इशाऱ्यानंतर भुसेंची तातडीची बैठक

dada bhuse
नाशिक – नाशिक-मुंबई-आग्रा महामार्गावरुन आजी-माजी पालकमंत्री समोरासमोर आले आहेत. माजी पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी महामार्गाच्या खड्ड्यांवरुन टोल बंद करण्याचा इशारा दिला आहे. आता महामार्ग प्राधिकरणाने ६ दिवसांचा वेळ मागितला आहे. त्यातच आता पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीने या विषयाला हात घालत अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. महामार्गावरील खड्ड्यांची डागडुजी व दुरूस्तीची कामे आठ दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश आज राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.
या संदर्भात पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथील शासकीय विश्रामगृह येथे महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब साळुंखे, तांत्रिक प्रबंधक नितीन पाटील यांचे समावेत बैठक घेतली.
यावेळी पालकमंत्री. श्री. भुसे म्हाणाले, मुंबई-आग्रा महामार्गावर खड्डे पडल्याने प्रवाशांना व वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सदर खड्डे तातडीने भरून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा. या संदर्भात जनभावना अतिशय तीव्र असून टोल बंद ची मागणी नागरिक करू लागले आहेत. यासंदर्भात भविष्यात उद्भभवणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग च्या प्रशासनाची राहील. नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अपघात क्षेत्रांचे सर्वेक्षण करून त्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. आवश्यक त्या ठिकाणी सर्व्हिस रोड, उड्डाणपूल यांचाही प्रस्ताव तातडीने करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना यावेळी देण्यात आल्या. नाशिक शहरातून जाणाऱ्या महामार्गाचीही डागडुजी व दुरूस्त तातडीने करण्या संदर्भात सूचना यावेळी देण्यात आल्या.
नाशिक महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात डागडुजीचे व दुरुस्तीचा कामे पूर्ण होणार नाहीत अशा अधिकाऱ्यांवर तात्काळ प्रशासकीय कार्रवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना यावेळी महापालिका आयुक्तांना देण्यात देण्यात आल्या आहेत. आठ दिवसात जागडूजी व दुरूस्तीची कामे मोठ्या प्रमाणात कामे पूर्णत्वास येतील याची दक्षता सर्व यंत्रणांणी घ्यावी, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
Edited by : Ratnadeep Ranshoor