शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कमळावरच निवडणूक लढवणार: खोत

विधानसभा निवडणुकीत रयत क्रांती संघटनेचे उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरच निवडणूक लढतील, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली.   
 
सदाभाऊ खोत विधान भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना होते. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, रयत क्रांती संघटना हा कोणताही पक्ष नाही. भारतीय जनता पक्षाचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन कोणत्या जागांवर आपले उमेदवार निवडून येऊ शकतील यावर संयुक्तपणे प्रथम चर्चा करतील. त्याबाबतचा एकत्रित अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर होणाऱ्या वाटाघाटींमध्ये किती जागा घटक पक्षांना मिळतील हे ठरण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.