शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 जानेवारी 2025 (17:35 IST)

अमरावतीत बांगलादेशींचे बनावट जन्म दाखले बनवण्याचा खेळ सुरू असल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा

सध्या देशात बेकायदेशीर बांगलादेशी राहत आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी भारतात राहणाऱ्या बांगलादेशींवर मोठा दावा केला आहे. अमरावतीच्या आजनगाव सुर्जीमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्राचे रॅकेट सुरु असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. 

बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत भाजप नेते सातत्याने पुरावे सादर करत आहेत. सोमय्या यांनी दावा केला की, 6 महिन्यांत 1450 हून अधिक लोकांचे जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज आले आहेत. त्यापैकी 1400 बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, 2011 च्या जनगणनेनुसार अंजनगाव सुर्जी तहसीलची लोकसंख्या 1 लाख 60 हजार 903 असून त्यापैकी 28180 मुस्लिम लोकसंख्या आहे. ते म्हणाले की, गेल्या 6 महिन्यांत जन्म प्रमाणपत्रासाठी 1450 हून अधिक अर्ज प्राप्त झाले असून त्यात बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या 1400 अर्जांचा समावेश आहे.

सोमवारी म्हणजेच 13 जानेवारीला अंजनगाव सुर्जी अमरावती येथे जाऊन पोलिसांना ही माहिती देणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मालेगाव वगळता इतर जिल्ह्यांमध्ये खोट्या जन्म दाखल्यांचा खेळ सुरू असल्याचे म्हटले होते.

किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर अमरावतीत बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. सोमय्या यांनी मालेगावात 1000 बांगलादेशी मुस्लिम आणि रोहिंग्यांना फसवणूक करून जन्म प्रमाणपत्र देण्यात असल्याचा आरोप केला होता या नंतर अंजनगाव सुर्जी तालुक्यात आलेल्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली. एसआयटी प्रकरणाचा तपास करत आहे.

या पॅनेलचे नेतृत्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी आणि मुख्य अधिकारी करत आहेत. या प्रकरणाचा तपास अहवाल लवकरच सादर करण्याचे आदेश या समितीला देण्यात आले आहेत. पोलिसही त्यांच्या स्तरावर या प्रकरणाचा तपास करतील.
 
Edited By - Priya Dixit