शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जानेवारी 2025 (16:59 IST)

शरद पवार भाजपसोबत जाणार की नाही? पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय झाला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या नंतर काही दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची दोन दिवसीय बैठक झाली. या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या वृताचे खंडन केले आहे.

मी मरे पर्यंत भाजपच्या सोबत जाणार नाही असे ते म्हणाले. तर पक्षाच्या नेत्यांनी शरद पवार यांना पक्षाला मजबूत करण्यासाठी पावले उचलण्याचे अधिकार दिले आहे. पक्षाध्यक्ष यांना पूर्णपणे पाठिंबा देण्याचे आमदार आणि खासदारांनी एकजूट राहण्याचे बोलले.

बैठक वाय.बी. चव्हाण केंद्रात झाली असून या बैठकीत शरद पवार यांच्याशिवाय पक्षाचे राज्यस्तरीय अधिकारी, जिल्हा व तालुकाध्यक्ष सहभागी झाले.

या बैठकीनंतर आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले की, आजची बैठक संपली असून दोन दिवसीय बैठक कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आणण्यासाठी होती. या बैठकीत राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला आणि तरुणांना 50 टक्के तिकिटे देण्याचा निर्णय घेण्यात आला. 
Edited By - Priya Dixit