बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (13:27 IST)

सोमय्या दापोली दौर्‍यावर; प्रतिकात्मक हातोडाही सोबत

भाजप नेते किरीट सोमय्या हे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टवर हातोडा पाडण्यासाठी दापोलीकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी एक प्रतिकात्मक हातोडाही सोबत घेतला आहे.
 
सोमय्यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील मुरुडमध्ये रिसॉर्टबाबत आरोप केले होते. या संदर्भात आज परबांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अशात आज सोमय्या आज दोपाली दौर्‍यावर आहे. त्यांच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आहे. 
 
किरीट सोमय्या तब्बल 150 गाड्यांचा ताफा घेऊन दापोली पोहचले आहे. त्यांच्यासोबत प्रतिकात्मक हातोडाही आहे जो जनतेच्या भावनेचं प्रतिक असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनधिकृत बांधकाम असणाऱ्या मंत्र्यांचं हॉटेल तात्काळ पाडावं नाहीतर अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली आहे.