शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (11:07 IST)

अल्पवयीन पीडितेचे बलात्काराच्या आरोपीशी लग्न लावले

The minor victim married the accused of rapeअल्पवयीन पीडितेचे बलात्काराच्या आरोपीशी लग्न लावले  Marathi Regional News In Webdunia Marathi
नागपुरात एका अल्पवयीन मुलीशी एका 22 वर्षाच्या नराधमाने बलात्कार केला त्यानंतर ती गर्भवती झाली. पीडितेच्या कुटुंबीयांनी पीडितेचे लग्न त्या आरोपीशीच लावून देण्याची घटना घडली आहे. सदर आरोपी त्या मुलीच्या शेजारी राहायचा.मुलीला आई नाही. ती आपल्या वडिलांसह राहायची. एके दिवशी मुलीच्या घरात कोणी नसताना आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर मुलगी गरोदर झाली. ही  गोष्ट दोन्ही कुटुंबियांच्या लक्षात आली. दोन्ही कुटुंबीयांनी सामंजस्याने एकमत होऊन पोलिसात कोणतीही तक्रार न करता दोघांचे आपसात लग्न लावण्याचा निर्णय घेतला. आणि 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे 22 वर्षाच्या आरोपीशी बळजबरी लग्न लावून दिले. नंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे आणि ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळतातच आरोपीला बलात्कार आणि लैंगिक गुन्हापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत अटक केली आहे. सामाजिक कर्त्यांनी पीडी मुलीशी विचारपूस केली असता मुलीवर बलात्कार केल्याचे आणि त्यापासून मुलगी 4 महीन्याची गरोदर असल्याचे समजले आरोपीला अटक केली असून मुलीला वैद्यकीय तपासणीत ठेवले आहे.