शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 नोव्हेंबर 2021 (21:37 IST)

किशोरी पेडणेकरांचा कंगनाला टोला; म्हणाल्या – ‘प्लास्टिकच्या घोड्यावर बसून सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री देणे हिंदुस्थानचा अपमान’

मुंबई :  आपल्या वादग्रस्त विधानावरुन सोशल मिडियावर सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौतने देशाबद्दलही वादग्रस्त विधान केलं. यामुळे मागील काही दिवसांपासून कंगणावर सर्वत्र टीका होताना दिसत आहे. यातच मुंबईच्या विद्यमान महापौर किशोरी पेडणेकर  यांनी देखील कंगणावर प्रहार केला आहे. त्यावेळी पेडणेकर या मुंबईमध्ये बोलत होत्या.
देशाला 1947 साली मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केलं.या वादग्रस्त विेधानानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यावेळी बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘प्लास्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री पुरस्कार देणे हा तर अखंड हिंदुस्थानचा अपमान आहे.तिच्यावर कारवाई करा आणि विषय संपवा,’ असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
 
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘कंगना जन्मली कुठे, रोजीरोटी कमवायला येते कुठे आणि येथे येऊन माझ्या मुंबईची आणि महाराष्ट्राची बदनामी करते. पाकिस्तानशी तुलना करते.दर तीन महिन्यांनी प्रसिद्धीच्या झोतात ती यायला बघते, अशी जोरदार टीका त्यांंनी केली.तर, आपल्या देशात अनेक लोक आहेत की जे अतिशय चांगलं काम करतात.पण हिच्यात काय एवढं टॅलेंट आहे की तिला पद्मश्री पुरस्कार दिला गेला हे मला अजूनही समजलेलं नाही.कंगनाचं बेताल वक्तव्य म्हणजे स्वातंत्र्यासाठी आहुती दिलेल्या लोकांचा अपमान आहे.हा अखंड हिंदुस्तानचा अपमान आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.
 
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या, कंगनाच्या बेताल वक्तव्याची दखल घेऊन तिच्यावर तातडीनं कारवाई करायला हवी अशीही मागणी पेडणेकर यांनी केलीय.
‘माझी गृह विभााला हात जोडून विनंती आहे की त्यांनी अशा बेताल मुलीवर निट लक्ष द्यायला हवं.जी संपर्ण हिंदुस्थानचा अपमान करते आणि सर्व लोकांमध्ये फूट पाडते.तिचा निषेध आपेल्याला न्यायिक बाजूनं करावं लागेल.तिच्यावर कारवाई करुन विषय संपवून टाकायला हवा’, असं देखील पेडणेकर यांनी म्हटलं आहे.