शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 5 ऑक्टोबर 2022 (21:22 IST)

कोकण रिफायनरी मुद्दा : समर्थक आणि विरोधकांची जोरदार मोर्चेबांधणी

nanar prakalp
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा कोकणातील रिफायनरी प्रकल्पाच्या (नाणार तेलशुद्धीकरण) पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं असल्याची माहिती मिळत आहे. या पत्रामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार रिफायनरीबाबत सकारत्मक असल्याचं समझल्यानंतर समर्थक आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. रिफायनरीविरोधात मोर्चा काढल्यानंतर आता विरोधक सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेणार आहेत. तर, रिफायनरी समर्थकांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. आपल्या दिल्ली भेटीत रिफायनरी समर्थक थेट केंद्रातील मंत्र्यांची भेट घेत रिफायनरीच्या सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करणार आहेत.   
 
 30 मार्च रोजी रिफायनरी विरोधकांनी मोठ्या संख्येनं मोर्चा काढत नवीन जागेवरील रिफायनरीला आपला विरोध असल्याचं देखील दाखवून दिलं. राजापूर शहरातील जवाहर चौक ते तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चात शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेनं आमचा विश्वासघात करू नये अशी मागणी देखील करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेनं स्थानिकांना हवंय ते आम्ही करणार असल्याचं सांगतिले.  मुख्य बाब म्हणजे बुधवार अर्थात 6 एप्रिलचा दिवस हा प्रकल्पाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो. यावेळी राजापूर तालुक्यातील धोपेश्वर या गावचा ग्रामसभा आहे. त्यावेळी स्थानिकांचं मत रिफायनरी प्रकल्पााबत घेतलं जाणार आहे.