शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (08:08 IST)

नलिनी कड यांचा सायकलिंगचा विक्रम; १२ तास सायकल चालवून गाठला १९४४ किमीचा टप्पा

सायकलिंगमध्ये आजवर विविध धाडसी कामगिरी पार पडलेल्या नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनच्या सदस्या नलिनी कड यांनी नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सलग १२ तास सायकल चालवून १९४४ किमीचा टप्पा गाठल्याची कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल नाशिक सायकलीस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, उपाध्यक्ष किशोर माने, क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, मनीषा रौन्दळ, रवींद्र दुसाने आदींसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक केले गेले. शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजता नलिनी कड यांनी या कामगिरीला प्रारंभ केला. शनिवारी सकाळी साडे सहा वाजता त्यांनी १९४४ किमीचा पल्ला गाठला. गोल्फ क्लब सायकल ट्रॅक, महिंद्रा सर्कल, सातपूर-त्र्यंबक रोड या ठिकाणी त्यांनी ही कामगिरी केली. नलिनी कड यांनी यापूर्वी नाशिक ते गेट वे ऑफ इंडिया आणि पुन्हा नाशिक, नाशिक ते शेगाव,नाशिक ते शिवनेरी या राईड्स देखील यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या आहेत.