रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (07:17 IST)

मनपा-झेडपी निवडणूक जाहीर..’या’ व्हायरल मॅसेजमुळे इच्छुक गोंधळात

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीचे धुमशान सुरू असताना महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जाहीर झाला असल्याचा मेसेज व्हाट्सअप वर फिरत आहे. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये इच्छुक असलेले उमेदवार गोंधळून गेले आहेत. अनेक उमेदवारांनी हा मॅसेज कितपत खरा आहे, हे खात्री करून घेण्यासाठी गल्ली ते मुंबईपर्यंत फोन झाडले आहेत. पण हा मेसेज फेक असल्याचे समोर आले आहे. उत्तर पोट निवडणुकीच्या तोंडावर अज्ञातांनी जाणीवपूर्वक व्हायरल केला जात असल्याची चर्चा सध्या कोल्हापुरात सुरू आहे.
 
सध्या कोल्हापुरात उत्तर पोटनिवडणुक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून प्रचाराचा धूम धडाका सुरू आहे. मात्र अचानक आज दिवसभरात कोल्हापुरातील नागरिकांच्या व्हाट्सअप वर महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर इच्छुक पूर्णता गोंधळून गेले आहेत. याची खात्री करण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या नेत्यांना फोनवरून संपर्क साधून याची खात्री केली आहे. मात्र हा मेसेज फेक असल्याचं समोर आला आहे. तर दुसरीकडे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मधील इच्छुक उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी हे मेसेज जाणून-बुजून वायरल केले जात असल्याची चर्चा कोल्हापुरात आहे. त्यामुळे इच्छुकांनी गोंधळून जाऊ नये. असे आवाहन जाणकारांकडून केले जात आहे.
 
नेमके काय आहे ते मेसेज पाहूयात
मनपा ईलेक्शन चे वेळापत्रक जाहीर
१५-४-२०२२ ला निवडणूक आचारसंहीता लागणार
२९-४-२०२२ ला वार्डरचना व वार्ड आरंक्षण ची सोडत
१-५-२०२२ ते ६-५-२०२२ आक्षेप दाखल करणे
१०-५-२०२२ ते १७-५-२०२२ला नामंकन दाखल करण्याची संधी
२०-५-२०२२ ला नामंकन अर्ज छाननी
२०-५-२०२२ ला नामंकन मागे घेण्याची शेवटची तारीख
५-६-२०२२ ला मतदान
१०-६-२०२२ ला निकाल
 
ब्रेकिंग न्यूज
जिल्हा . परीषद. व पचायत. समीती च्या निवडणुका जाहीर
सुप्रीम कोर्टाने ओबिसी आरक्षण फेटाळले
15 एप्रिल ते 20 एप्रिल अर्ज भरणे
21 एप्रिल अर्ज छाननी
22 एप्रिल ते 24 अर्ज मागे घेणे
26 एप्रिल चिन्ह वाटप
10 मे ला सकाळी 9 ते 5.30 मतदान
12 मे ला सकाळी 9 वाजतापासून मतमोजणी
3 एप्रिल पासून आदर्श आचारसंहिता लागू