अवकाळी पावसाचा फटका हापूसला, बाजारपेठेत आवक कमी
यंदा अवकाळी पावसाने उच्छाद मांडला असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यंदा इतर पिकांसह हापूस आंब्याला देखील अवकाळी पावसाचा फटका पडला आहे. त्यामुळे कोंकणातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. यंदा गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून नवी मुंबईतील वाशी बाजार पेठेत येणाऱ्या हापूस आंब्याचा पेट्यांची आवक कमी झाल्यामुळे आणि दर तेवढेच असल्यामुळे यंदा आंबा प्रेमींना हापूसची चव घेता आली नाही.
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात आंबा बागा हजारो हेक्टरवर असून हापूस आंब्याची बाग आहेत. दरवर्षी येथे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदाच्या वर्षी अवकाळी पावसाचा फटका शेतकरींना पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असे. यंदा गुढी पाडव्याला बाजारपेठेत पेट्यांची आवक 30 टक्क्यांनी कमी झाल्याची सांगण्यात येत आहे. आवक वाढविण्यासाठी अजून 15 ते 20 दिवसांची वाट पाहावी लागणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.