गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (10:50 IST)

सेल्फीच्या नादात तिघांचा तलावात बुडून मृत्यू

सेल्फी घेणे जीवघेण ठरू शकते. सेल्फी घेण्याच्या नादात बरेच जण आपला जीव गमावून बसतात. तरी ही सेल्फी प्रेमी सेल्फी घेण्यासाठी नको ते स्टंट करतात आणि आपला जीव गमावतात. अशीच एक घटना कवडगाव तालुका वडवणी येथे शनिवारी संध्याकाळी घडली आहे. माहेरी आलेली मुलगी आपल्या पती आणि पतीच्या मित्रासह गावातील तलावाच्या ठिकाणी फिरायला गेले होते. सेल्फी काढण्यासाठी  तिघे पाण्यात गेले आणि सेल्फी काढण्याच्या नादात तिघे ही पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. ताहा शेख(22) रा.कवडगाव सिद्धिक शेख रा. अंबड जी.जालना आणि शहाब शेख रा. बिहार असे मृतकांची नावे आहेत. 
 
ताहा शेख यांचा विवाह काही महिन्यापूर्वी सिद्दिक शेख यांच्यासह झाला. हे नवदांपत्य वडवणी ताहाच्या माहेरी आले होते. त्यांच्या सोबत सिद्दिकचा मित्र शहाब शेख हा देखील आला होता. हे तिघे गावाच्या तलावाच्या परिसरात फिरायला गेले आणि त्यांचा सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळतातच वडवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. तिघांचे मृतदेह तलावाच्या पाण्यातून काढले. पुढील प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.