शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (10:00 IST)

आकाशातून पडला आगीचा गोळा,राज्यात उल्कावर्षाव झाला

नागपूर शहरातून आकाशात संध्याकाळी 7 वाजून 47 वाजता रहस्यमय प्रकाश दिसला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास पाच ते सात प्रकाशाचे भाग आकाशातून प्रवास करत होते. नागपूर शहरातील अनेक भागातील लोकांनी हा प्रकाश पाहिला. अनेकांनी आकाशातील प्रकाशाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढले. हा प्रकाश जवळपास 15 सेकंदापर्यंत आकाशात दिसल्याचे सांगण्यात  येत आहे. 
 
"शनिवारी रात्री चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांत आकाशातून जलदगतीने काही लाल रंगाच्या वस्तू खाली येत असल्याचं स्थानिकांना दिसले. दरम्यान, सिदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे रात्री 7 वाजून 45 मिनिटांनी एक धातूची रिंग कोसळली. आकाशात ही रिंग जेव्हा होती ती लाल तप्त होती. ती एवढ्या जोराने जमिनीवर पडली की मातीमध्ये ती रुतली. ही रिंग आठ फुटाच्या व्यासाची आहे.
 
लाडबोरी गावातील शेतात धातूचे मोठे तुकडे आढळून (Meteorite or satellite pieces) आले असून यातील एक गोल तुकडा सगळ्यात मोठा आहे. हा मोठा तुकडा एखादा निकामी उपग्रह वा यानाच्या इंधन टाकीचा तुकडा असावा एवढा मोठा आहे. याशिवाय अन्य धातूचे तुकडेही शेतात पडले आहेत. याठिकाणी रात्री पोलिसांनी हे तुकडे ताब्यात घेतल्याची माहिती आहे. अवकाशातून शेतात काही तरी पडल्याचे दिसल्यामुळे घटनास्थळी गावकऱ्यांची मोठा गर्दी झाली होती.