शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (10:19 IST)

जितेंद्र आव्हाडांची महागाईवरून मोदी सरकारवर टीका

अमेरिकेत हवेने पोट भरणाऱ्या मशीनचा शोध लागला आहे. ही मशीन लवकरच भारतातही लाँच होणार आहे. त्यामुळे महागाई कितीही वाढली तरी काळजी करू नका अमेरिकेहून हवेने पोट भरणारं मशीन मागवा. असा उपरोधिक टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.
 
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. याविषयी बोलताना मंत्री आव्हाड यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते अंबरनाथमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
 
"अमेरिकेत सध्या हवेने पोट भरणारं मशीन विकसित झालं आहे. लवकरच ही मशीन भारतात येईल. महागाई कितीही वाढली, पेट्रोल अगदी अडीचशे-तीनशे रुपये लिटर जरी झालं तरी काळजी करण्याची आवश्यकता नाही. हवेतून पोट भरणारं मशीन मागवा आणि निश्चिंत व्हा," असं आव्हाड यावेळी म्हणाले.