शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (12:41 IST)

नवाब मलिक यांची जामीनसाठी सुप्रीम कोर्टात धाव

आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) प्रकरणात अटकेत असलेले कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सुटकेसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
 
मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन नाकारण्यात आल्याने मलिक जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला.
मंत्री नवाब मलिक यांना 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे. दरम्यान, त्यांनी मुंबई हायकोर्टात मलिक यांनी जामिनासाठी अर्ज केला असता तो फेटाळून लावण्यात आला होता.
 
या निर्णयाविरोधात मलिक यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. माझी अटक पूर्णपणे बेकायदेशील असून मला तात्काळ सोडले जावे, अशी विनंती मलिक यांनी आपल्या अर्जात केली.