शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 4 एप्रिल 2022 (08:11 IST)

घरफोडीच्या गुन्ह्यातील सतरा वर्षांपासून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात आजवर यशस्वी झालेला गुन्हेगार अखेर १७ वर्षानंतर रविवारी नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाच्या जाळ्यात अडकला. सोमनाथ पिंपळे (वय ३८) रा. पिंपळे सदन, गोसावीवाडी, नाशिकरोड असे या कारवाईत अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. २००५ मधील जुलै महिन्यात देवळाली कॅम्प रोडवरील सौभाग्य नगर येथील सेलना जक्सन यांच्या घरी बारा हजार रुपयांची घरफोडी झाली होती. नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न झालेल्या पाच संशयितांपैकी किरण पिंपळे, सुरज काळे, पंकज उर्फ विनोद पिंपळे रा. गोसावीवाडी आणि संदीप जाधव रा. नेहरूनगर हे चार संशयित पोलिसांच्या हाती लागले होते. तर सोमनाथ पिंपळे हा पाचवा संशयित तेंव्हापासून फरार होता. सोमनाथ पिंपळे हा संशयित गोसावीवाडी येथे आलेला असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रकाश भालेराव यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या पथकातील पोलीस हवालदार प्रकाश भालेराव, शंकर काळे गुलाब सोनार, यादव डंबाळे, लोंढे, राजेंद्र घुमरे आदींनी सापळा रचून ही कारवाई केली.