मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (20:43 IST)

कोल्हापूर : मुलाच्या आत्महत्येच्या धक्क्याने वडिलांचा मृ्त्यू, पट्टणकोडोलीत घटनेने पंचक्रोशीत हळहळ

कोल्हापूर पट्टणकोडोली(ता.हातकणंगले) येथील नवीन बस स्थानकाजवळ ,इंगळी रोड लगत राहण्यारा एका युवकाने राहत्या घरातील जुन्या संडास बाथरूमच्या खोलीत लोखंडी पाईपला सुताची दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.विजय आनंदा परीट(वय-32) असे त्या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.या घटनेची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे.दरम्यान, आत्महत्या होऊन 24 तास होण्याच्या आताच मुलगा सोडून गेल्याचे दु:ख होऊन वडिलांचे देखील हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन निधन झाले. या अतीभयंकर दु:खद घटनेमुळे गावात सर्वत्र दु:खाचे सावट पसरले असून हळहळ व्यक्त केले जात आहे.
 
याबाबत पोलिसातून व घटना स्थळावरून समजलेली माहिती अशी, विजय परीट वडील,भाऊ,भावजय,पत्नी,मुले यांच्यासोबत नवीन बस स्थानकाजवळ इंगळी रोड लगत राहात होते. विजय परीट हा लाँड्रीचा व्यवसाय करीत होता. सोमवार 31जुलै रोजी दिवसभर त्याने  व्यवसाय केला आणि रात्री साडे दहा ते आकारा वाजण्याच्या सुमारास  राहत्या घरातील  लोखंडी पाईपला सुती दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या घटनेची पोलिसांत श्रीरंग पांडुरंग परीट यांनी फिर्याद दिली.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.दरम्यान, 24 तास होण्याच्या आगोदरच दु:खाने व्याकुळ झालेल्या वडिलांचा हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले.  या घटनेने पंचक्रोशात हळहळ व्यक्त होत आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor