शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (21:38 IST)

कोल्हापूर पुढील २४ तासात धोकापातळी गाठण्याची शक्यता,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

flood
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणक्षेत्रात पाऊस वाढल्याने धरण साठ्यात वाढ होत आहे. यामुळे नदीपात्रात पाणी वाढण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण असेच सुरू राहिल्यास पुढील २४ तासात धोकापातळी गाठण्याची शक्यता आहे. म्हणूनच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. तसेच ग्रामस्थांनी तलाठी व ग्रामसेवकांच्या संपर्कात राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असेही सांगण्यात आले आहे.
 
दरम्यान सायंकाळी चार वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी २६फूट ६ इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे.