शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (10:10 IST)

पुणे-बेंगळुरू महामार्गावर अपघात , ५ विद्यार्थी ठार

कोल्हापूर येथे पहाटे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच विद्यार्थी ठार झाले असून २५ जण जखमी झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी सांगली वालचंद महाविद्यालयाचे आहेत. अरुण अंबादास बोंडे ( २२), केतन प्रदीप खोचे (२१), प्रवीण शांताराम त्रिलोटकर (२३) सुमित संजय कुलकर्णी ( २३), सुशांत विजय पाटील (२२) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत.

शिवजयंतीनिमित्त हे सर्वजण पन्हाळ्याहून सांगलीला शिवज्योत घेऊन जात होते. त्यासाठी त्यांनी ट्रक केला होता. ट्रकमध्ये सुमारे ३० विद्यार्थी होते. सांगलीला जात असताना समोरून आलेल्या दुचाकीला चुकवताना हा अपघात झाला. या अपघातात महामार्गावरील पुलावरच ट्रक उलटला होता. ट्रकखाली दबल्या गेल्याने पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.