कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुक : काँग्रेस विरुद्ध भाजप
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप असा खरा सामना रंगणार आहे. दरम्यान, या जागेवर शिवसेना आग्रही होती. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल होते.
नाराज व्हायचं कारण नाहीच, करारच तसा होता. शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते की उमेदवारी आपल्याला मिळेल पण करारानुसार ती जागा काँग्रेसलाच जाणार होती. मी शिवसैनिकांना समजावत आहे. मी कधीच तिकीट द्यावे, असे म्हणालेलो नाही. पक्ष प्रमुखांचा आदेश महत्वाचा. 2019 मध्ये 123 जागेपैकी 70 जागेवर सेनेचा पराभव झाला त्यात मी होतो, तरी साहेबांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष पद मला दिले. शिवसैनिक पाठीत वार करणारा कार्यकर्ता नाही. शिवसैनिक थोडे नाराजी असणार स्वाभाविक आहे. तरी आमच्यासाठी मातोश्रीचा आदेश अंतिम आहे, असे राजेश क्षीरसागर म्हणाले.
राजेश क्षीरसागर यांची नाराजी दूर झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत 30 हजारच्यावर मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराला विजय मिळवून देऊ, अशी मोठी घोषणा राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. निवडणूक लागलेली आहे. जिल्हाप्रमुख आहेत. नगरसेवक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन घ्यायला जात आहे. जनता दुधखुळी राहिलेली नाही. भाजप संभ्रम पसरवत आहे. जनतेने भाजपचे नामोनिशान करण्याचे ठरवले आहे, असे ते म्हणाले.