‘निवडणुकीआधी पुन्हा एकदा भाजपमध्ये महाभरती : दानवें  
					
										
                                       
                  
                  				  सध्या राज्यात सत्ताधारी विरूद्ध विरोधी पक्ष अर्थात महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळतोय. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच होत्या. औरंगाबाद येथे बोलताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ह्यांनी महाविकासआघाडीचा चांगलाच समाचार घेतलाय.
				  													
						
																							
									  
	
	निवडणूकीआधी महाविकास आघाडीतील आमदार फुटून भाजपमध्ये येतील असे भाकीत रावसाहेब दानवे यांनी केले आहे. अनेक आमदार आताही भाजपच्या संपर्कात आहेत, आताच त्यांची नावे सांगून त्यांची आमदारकी धोक्यात आणू इच्छित नाही. असंही ते म्हणाले.
				  				  
	
	महाविकासआघाडीमधील 25 आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते. मात्र थोडीफार मदत करून त्यांना महाविकास आघाडीने सावरलं. असा गौपेयस्फोटही त्यांनी केला.