1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2023 (11:29 IST)

Kolhapur: पोलिसांच्या भीतीने तरुणाची इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी, तरुणाचा दुर्देवी मृत्यू

death
कोल्हापुरात राजेंद्र नगर परिसरात पोलिसांनी एका इमारतीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलीस पकडतील या भीतीपोटी दोन तरुणांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकली त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर तरुण गंभीर जखमी झाला. साहिल मायकेल मिणेकर असे मयत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील राजेंद्र नगर परिसरातील एका इमारतीत काही जण जुगार खेळात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी रात्री 11 वाजेच्या सुमारास या इमारतीत छापा टाकला.

पोलीस पकडतील या भीतीमुळे 26 वर्षीय साहिल मायकेल मिणेकर आणि दत्तात्रय देवकुळे या तरुणांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकली. त्यात साहिलच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला तर दत्तात्रय हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी साहिलचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तर दत्तात्रय गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. 

साहिलच्या मृत्यूची बातमी कुटुंबियांना कळतातच त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रुग्णालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आला. 
 
 
Edited by - Priya Dixit