कोयनेचा पाणीसाठा २ टीएमसीने वाढून २३.०४ टीएमसीवर
कोयना पाणलोट क्षेत्रात गुरुवारी रात्री पावसाचा जोर थोडा ओसरला. मात्र गुरुवारी दिवसभर अधून मधून कोसळणाऱ्या मुसळधार सरींमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात येणारी पाण्याची आवक वाढत आहे. ही आवक शुक्रवारी सकाळी आठपर्यंत प्रतिसेकंद २६ हजार ८५७ क्यूसेक्स इतकी सुरू आहे
.कोयनाधरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने दरम्यान शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरणात पाणीसाठ्यात वाढ झाल्याची नोंद झाली आहे.
कोयनानगर येथे ८८ (८७५), नवजा येथे १२२(११८०), मिमी तर महाबळेश्वर येथे १२१ (११०८) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा २१.७२ टीएमसी इतका झाला आहे.