शनिवार, 15 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 (17:45 IST)

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था उध्वस्त करत आहे - अंबादास दानवे

महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येत आहे. लाडकी बहीण योजना महायुती सरकारने सुरु केली आहे.या योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था उध्वस्त होत असल्याचे शिवसेना युबीटीचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहे.  
लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारची तिजोरी रिकामी झाली असून राज्य सरकारला इतर योजना राबविण्यात अडचण येत आहे. म्हणून लाभार्थींची संख्या कमी करण्यासाठी सरकार लाभार्थींच्या पात्रतेची पुनर्तपासणी करत आहे. 
महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार लोकांच्या हितांसाठी सुरु केलेल्या विविध योजना थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शिवसेना यूबीटीचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते म्हणाले की राज्यावर 8 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे.  
महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नाही. असे दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. सरकार आता योजना बंद करण्याचा आणि लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना महापालिका निवडणुकीनंतर बंद होणार असा दावा केला जात आहे. 
निवडणुकीपूर्व महायुती सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना जाहीर केली. त्यावेळी आम्ही इशारा दिला होता की या योजना राज्यातील अर्थव्यवस्था उध्वस्त करतील आणि आज तसेच घडत असल्याचे दानवे म्हणाले. 
 
Edited By - Priya Dixit