1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जुलै 2023 (20:43 IST)

Landslide big update भूस्खलन मोठी अपडेट! सिडकोने मदतीसाठी १००० मजूर पाठविले; फडणवीसांची माहिती

devendra fadnavis
Landslide big update रायगडमध्ये इर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावावर दरड कोसळली. यामध्ये ४० हून अधिक घरे गाडली गेली आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे उत्तर संपल्यानंतर फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. यामध्ये त्यांनी दुपारी तीन वाजेपर्यंतची माहिती दिली. इर्शाळवाडी भूस्खलन मातीचा ढिगारा उपसण्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची गरज होती. यामुळे तातडीने सिडकोने १००० मजुरांना तिकडे पाठविले आहे. यासोबत तीन मशीनही तिकडे रवाना करण्यात आल्या आहेत. मजूर आणि एक मशीन घटनास्थळी पोहोचली आहे, असे फडणवीस म्हणाले.
 
आताही तिथे मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि ढग आहेत. यामुळे दोन मशीन हेलिकॉप्टरने तिकडे पोहोचविण्यात अडथळे येत आहेत. त्या लवकरात लवकर पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अकुशल कामगार आणि एनडीआरएफचे जवान काम करत आहेत. परंतू, पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आतापर्यंत ९८ जणांना वाचविण्यात आले आहे, असे फडणवीस म्हणाले.