सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By
Last Updated : बुधवार, 19 जुलै 2023 (23:56 IST)

Maharashtra Monsoon Tourism महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणी पावसाळ्यात नक्की भेट द्या

tourism
महाराष्ट्रातील या सुंदर ठिकाणी पावसाळ्यात नक्की भेट द्या
सध्या पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली आहे.त्यामुळे लोकांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.लोक पावसाळ्यात सहलीला जाण्याचे बेत आखत आहे. महाराष्ट्रातील काही मनमोहक अशी पर्यटन स्थळे आहेत ज्या ठिकाणी पावसाळ्यात हजेरी लावायलाच पाहिजे.चला तर मग जाणून घेऊ या.कोणती आहे ही स्थळे.
1 लोणावळा :  लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण सहयाद्री पर्वतरांगेच्या कुशीत समुद्रसपाटीपासून सहाशे तीस मीटर उंचीवर आहे. पुण्यामुंबईपासून जवळ असल्याने वीकएंडला रोजच्या घाईगर्दीतून थोडा वेळ बाजूला काढून पर्यटकांची पावले लोणावळयाकडे वळल्याशिवाय राहत नाहीत. मुसळधार पावसात चिंब भिजत येथील दर्‍याखोर्‍यात भटकंती करण्याची व भुशी धरणावर पावसाचे तुषार अंगावर झेलत चिंब भिजण्यातली मजा काही औरचं! आणि हो लोणावळ्यात गेलात तर तेथील चिक्की खाण्यास विसरू नका. चिक्कीसाठी हे गाव अतिशय प्रसिद्ध आहे. खास चिक्कीची अनेक दुकाने येथे आहेत.
 
2 खंडाळा- खंडाळा हा भोर घाटाच्या एका टोकावर आहे.जे डेक्कन पाठार आणि कोकणच्या मैदानाच्या दरम्यान रस्त्यावर जोडला जाणारा घाट आहे. या घाटातून सडक आणि रेल्वे वाहतूक जाते.मुंबई आणि पुण्याचा हा मुख्य दुवा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे खंडाळ्यातून जातो.  ड्यूकची नाक म्हणजे ड्युकोज नोज नावाच्या डोंगर मोठ्या वरून खंडाळा आणि भोर घाटाच्या सुंदरतेचा आनंद घेतला जाऊ शकतो.
 
3 ताम्हिणी घाट-गोवा महामार्गावर मुंबईपासून सुमारे 140 किमी अंतरावर असणारे हे ताम्हिणी घाट पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे.साहस आणि पर्यटनाचे सम्मिश्रण असलेले हे ठिकाण आहे.जर आपल्याला धाडस करण्याची आवड आहे तर आपण नक्की या ठिकाणी भेट द्या.हिरवेगार सौंदर्य,खोल दऱ्या,मुळशी धरण, डोंगरा वरून पडणारे धबधबे हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. येथे जवळच 30 किमी च्या अंतरावर सिंहगड किल्ला देखील प्रेक्षणीय आहे.
3 भीमाशंकर- हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असून हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत अतिशय घनदाट अरण्याने वेढलेले आहे.घनदाट जंगल आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळे हे प्रमुख पर्यटन स्थळ बनत आहे.भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.तसेच भीमा नदीचे उगम स्थान इथेच आहे.इथे अभयारण्यात रानडुक्कर, सांबर, भेकर,रानमांजर,रानससा,उदमांजर,बिबट्या सारखे प्राणी आणि इतर पक्षी आढळतात.इथे उडणारी खार वैशिष्टयपूर्ण आहे.इथे कोकणकडा,सीताराम बाबा आश्रम,नागफणी सारखी ठिकाण बघण्या सारखी आहे.
 
5 इगतपुरी-हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याचे गाव मुंबई-आग्रा महामार्गावरआहे.हे थंड हव्याचे ठिकाण असून इथे महिंद्रा आणि महिंद्राचे इंजिन बनविण्याचा कारखाना आहे.या परिसरातील वाहणारे धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात.अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, खोडाळा, सुंदरनारायण गणेश मंदीर याशिवाय कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा तसेच सांदण दरी, रंधा धबधबा इथे जवळपासची बघण्यासारखी ठिकाणे आहेत.कसाराघाटातील धुके अनुभवणे एक रोमांचकारी अनुभव आहे.इथे डोंगऱ्याच्या पायथ्याशी धम्मगिरी हे विपश्यना केंद्र आहे.इथून जवळ कावनई,त्रिंगलवाडी हे बघण्यासारखे किल्ले आहेत.
 
6 पाचगणी-महाराष्ट्रातील साताऱ्या जिल्ह्यातील पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे महाबळेश्वर पासून अवघे 18-20 की.मी.अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे. तसेच हे ठिकाण पब्लिक स्कुल साठी देखील प्रसिद्ध आहे.इथे जुन्याकाळातील पारशी लोकांनी बांधलेले बंगले देखील बघण्यासारखे आहे.इथे राहण्याची जेवण्याची उत्तम सोय आहे.पांच डोंगराच्या समूहावर असल्यामुळे हे ठिकाण पाचगणी म्हणून ओळखले जाते. खोल दऱ्या धबधबे, कमलगड, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रसिद्ध बघण्यासारखी स्थळे आहेत.
 
7 माथेरान-   हे हिल स्टेशन महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. ढगांनी वेढलेले पर्वत आणि पर्वतातून पडणारे धबधबे अतिशय सुंदर अनुभूती देतात.  माथेरानला  देशातील सर्वात लहान हिल स्टेशनचा दर्जा मिळालेला हे. येथे बघण्यासाठी बरेच व्यू पॉइंट्स, तलाव आणि उद्याने आहेत ज्यात मँकी पॉईंट, लिटिल चॉक, चॉक पॉइंट, इको पॉईंट, मनोरमा पॉईंट, सनरायझ आणि सनसेट पॉईंट प्रामुख्याने आहे. इथं धबधबे आणि ढग बघण्याची मजाच काही वेगळी आहे. ढगांनी वेढलेले पर्वत आणि पर्वतातून पडणारे धबधबे बघून आश्चर्य कराल . या अद्भुत दृश्यांचा आनंद घेणं स्वतःला रोमांचित करणारे आहे.
  
टीप :या सहलीच्या ठिकाणी जाताना स्वतःची आणि इतरांची काळजी अवश्य घ्या.