म्हणून तिने थेट खाजगी कोविड केअर सेंटरचीच केली उभारणी
लातूर शहरात एका खाजगी रुग्णालयात १० दिवस उपचार करुन ती तरुणी ठणठणीत बरीही झाली. मात्र कोरोना होणाऱ्या रुग्णांची तारांबळ होऊ नये यासाठी त्या तरुणीने ७० बेडचं जिल्ह्यातील पहिलं सर्व सोयींनियुक्त खाजगी कोविड केअर सेंटरचीच उभारणी केली.
लातूर शहरात राहणाऱ्या प्रेरणा होनराव, संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक-शैक्षणिक कार्य करतात. सततच्या जनसंपर्कामुळे गेल्या महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यावेळी त्यांना ऍडमिट होण्यासाठी लातूरच्या खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हता.
मात्र लातूरमध्ये कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे खाजगी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांची यादरम्यान होणारी परिस्थिती पाहाता, त्यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व सोयीनियुक्त असलेलं ७० बेडचं जिल्हातील पहिल्या खाजगी 'स्वास्थ्य कोविड सेंटर'ची उभारणी केली.