बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (12:05 IST)

या सरकारची मर्यादा 11 दिवसांपर्यत वाढवलेली आहे : नारायण राणे

“राज्यातील चालू घडामोडी पाहता सरकार आज पडेल की उद्या पडेल. पण मी त्याची मर्यादा 11 दिवसांपर्यत वाढवलेली आहे. त्यामुळे 11 दिवसात सरकार पडेल की नाही हे प्रसारमाध्यमांनी पाहावं,” असे भाकित नारायण राणे यांनी  वर्तवले.
 
“जेव्हा लोकसभेत CAA बील आलं तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर सभात्याग करुन बाहेर केले. पण सुरुवातीला पाठिंबा दिला. राज्यसभेत विरोध केला. सुरुवातीला पाठिंब्यानंतर विरोध होता. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट झाल्यावर त्यांनी याला पाठिंबा दिला आहे. ही चांगली गोष्ट आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं माणूसकीचा धर्म आहे,” असे वक्तव्य भाजप नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी  केलं. खासदार कपिल पाटील यांनी भिवंडीमध्ये चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन  नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले.