सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (08:16 IST)

बॅडमिंटनचे अडकलेले फुल काढताना विजेचा धक्का लागून चिमुरडीचा अंत

शहरातील नाशिकरोड भागातील सुंदर नगर येथे राहणारी सोनाली दिनकर निकुंभ (वय १०) या मुलीचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. बॅडमिंटन खेळत असताना वायरला अडकलेले फुल काढताना तिला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यातच तिचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बॅडमिंटन खेळत असताना बॅडमिंटनचे फुल खांबावरील वायरला अडकले. हे फुल काढण्यासाठी तिने लोखंडी पाईप घेतला. याच प्रयत्नात तिला जोरदार विजेचा धक्का बसला. ही बाब लक्षात येताच नागरिकांसह तिच्या कुटुंबियांनी तातडीने धाव घेत तिला बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिसांनी नोंद केली.