बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 13 ऑगस्ट 2020 (08:57 IST)

पालघरमध्ये १४ ते १८ ऑगस्ट पर्यंत टाळेबंदी

पालघर नगर परिषदात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने येथे १४ ते १८ ऑगस्ट पर्यंत शहरातील सर्व प्रकारच्या हालचालींवर र्निबध टाकणारे मनाई आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
 
या दरम्यान शहरातील सर्व दुकाने, हॉटेल, औद्योगिक आस्थापने, भाजीबाजार व मासळी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच औषधाची दुकाने आणि दुग्धालय यांना वगळण्यात आले असून अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून इतर वाहनांवर वाहतूक बंद ठेवण्याचे आणि इतर वाहनांना इंधन न देण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
 
पालघर नगर परिषद क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४४२ रुग्णांना करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.