सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 2 मार्च 2019 (17:53 IST)

शैक्षणिक क्षेत्रात लोकपाल नेमणार

राज्यात शैक्षणिक क्षेत्रासाठी विद्यापीठ स्तरावर लोकपाल नेमण्याची घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. अशा प्रकारे लोकपाल नेमणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य असल्याचा दावा त्यांनी केला. 

महाविद्यालयीन आणि शैक्षणिक संस्थामध्ये आणि विद्यापीठ स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात येतील. या केंद्रांमधून तक्रारींचे निरसन न झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना लोकपालांकडे दाद मागता येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या मनमानीला चाप लावण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.